राजेश,
कंफर्ट झोनच्या बाहेर पडण्यासाठी शुभेच्छा हव्यातच पण त्याशिवाय व्यक्तीला बाहेर पडावेसे वाटणे आवश्यक आहे. मी एखाद्या ठरावीक सुखात / यशात/ अवस्थेत समाधान मानतो/मानते आहे , पण त्याशिवाय इतर गोष्टी आहेत ज्या मी करू शकते/ शकतो आणि त्या मी केल्या पाहिजेत ही जाणीव असण मला गरजेच वाटत. अनेकांना जाणीव असते पण कुठलीतरी भीती - जसे अपयश, लोकनिंदा, कुठले तरी नुकसान अशा वेगवेगळ्या कारणांने लोक जैसे थे अशा समाधानकारक स्थितीत राहण मान्य करतात. तुम्ही म्हटलं तस प्रत्येकाकरता हे सीमोल्लंघन वेगळ असेल. पण किमान त्या दिशेन शोध सुरू होणं ही महत्त्वाची पायरी आहे.
एक विचार मंथन करणारा धागा सुरू केल्याबद्दल आभारी आहे.