"गझल"चे अनेकवचन "गझलें" आहे (गझलियात हे अनेकवचनसुद्धा वापरतात).
हा 'गज़लियात' प्रकार बहुधा 'गज़ल' हा अरबी मूळ असलेला शब्द आहे, सबब त्याचे अनेकवचन अरबी व्याकरणाच्या नियमांप्रमाणे झाले पाहिजे, या भावनेतून / उर्दूतील काही अंशी प्रचलित पद्धतीतून होत असावा काय? (चूभूद्याघ्या.) जाणकारांनी खुलासा करावा.
अवांतर: असाच (बहुधा 'मिसाल'चे अनेकवचन म्हणून) 'मसाइल' हा शब्द ('मिसालें'च्या ठिकाणी?) ऐकलेला आहे. (पाकिस्तानी दूरचित्रवाणीवर बेंबीच्या देठापासून आकांत करणारा एक भारत-अमेरिका-इस्राएलद्वेष्टा कट्टर पाकाभिमानी अतिरेकी लाल-टोपीधारी विदूषक हा शब्द वारंवार आणि आवर्जून वापरताना आढळतो. त्याचे नाव तोंडावर आहे - आठवेल! पाकिस्तानी दूरचित्रवाणीवर लक्ष ठेवून असणाऱ्या कोणत्याही इसमास परिचित असावा. ऐकून छान करमणूक होते. असो.)
(ता.क.: उपरोल्लेखित लाल-टोपीधारी विदूषकाचे नाव आठवले. झायिद हमीद! (दुवा क्र. १))