टग्याभाऊ,
माझ्या परिचयातील एका पाकिस्तानी गृहस्थाला मी गझलें आणि गझलियात याबद्दल विचारले. त्यालाही १०० टक्के खात्री नव्हती. मग त्याने मला त्यांच्या मातोश्रींचा नंबर दिला. बहुदा त्या माझ्याच वयोगटातल्या असाव्यात. त्यांनी मला सांगितले कीं दोन्ही अनेकवचने बरोबर आहेत. मग त्यांनी मी काय लिहिले आहे याची चौकशी केली. मी जेंव्हा विषय सांगितला तेंव्हां त्या म्हणाल्या कीं या संदर्भात गझलें हे अनेक वचन जास्त योग्य आहे.