प्रस्तुत प्रतिसादकर्त्याचे आडनाव देवी आहे की नाही ते माहीत नाही पण देवी हे आडनाव असू शकते, आहे. श्री.गणेश देवी हे लेखक आणि विचारवंत म्हणून सुप्रसिद्ध आहेत. त्यांचे दोन वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेले 'वानप्रस्थ' हे पुस्तक अतिशय गाजले होते. आदिवासी लोक,भाषा, संस्कृती याविषयीचे ते जाणकार आहेत. आदिवासी बोलींमध्ये साहित्य निर्माण व्हावे, त्यांचा विकास व्हावा या साठी ते 'ढोल' या नावाचे नियतकालिक चालवतात.त्यांनी विविध आदिवासी बोलींमध्ये अनेकांना लिहिते केले आहे. बडोद्यापासून थोडे दूर तेजगढ येथे त्यांच्या संस्थेचे काम चालते. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांचे काम वाखाणले गेले आहे..