एकतर दवाखान्याला देऊळ वगैरे म्हणण्याचे दिवस कायद्याने संपले त्याला आता १५-२० वर्षं झाली असतील. दवाखाना सुरू करतांना Shop Actचं 'लायसन' घ्यायला लागतं. 'व्यवसाय' कर भरावा लागतो. इतकं नाही अगदी दवाखान्यातला कचरा फेकायला सुद्धा 'बायो मेडिकल वेस्ट' च्या नावाखाली वेगळे पैसे भरावे लागतात.

सगळ्यात महतत्वाचं म्हणजे डॉ.ला 'सेवा देणारा' म्हणजे समाजसेवक नाही, तर कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट खाली  Service Provider बनवलेला आहे, अन त्या डॉक्टरला 'तसा' आपल्याच समाजाने कायदा करून बनवला आहे.

तेंव्हा डॉक्टरकडून फुकटात / स्वस्तात समाजसेवेची अपेक्षा चूक आहे.

ज्या प्रमाणे मॉलमध्ये जाऊन 'फॅब इंडिया' ला १५ रू. चा पंचा ३०० रू देऊन घेता येतो, तसं हे आहे. AC cabin मधला डॉक्टर हवा तर तितके पैसे लागणारच.

दुसरं म्हणजे, दुकान उभं करण्यात झालेला खर्च त्या दुकानदाराने तुमच्या खिशातून वसूल केला, तर तुम्हाला अजिबात वाईट वाटत नाही. दवाखान्यात काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? वर सांगितल्याप्रमाणे फॅब इंडियात न जाता खादी भांडारातून पंचा घ्यायला तुम्हाला आडकाठी कुणी केली आहे? शासकिय रुग्णालये आहेत. सेवाभावी दवाखाने आहेत. उदा. M.D. Skin ची पदवी घेतलेले सर्व डॉ. सारखेच शिक्षण घेतलेले आहेत. गावातही बालाजीचं देऊळ असतं की. तिरूपतीला गेल्यावर चंपी करून घ्यावीच लागणारे. भोकाड पसरण्यात काय हशील?

वरून असंही नाही की तिरूपती 'पावला' नाही तुम्हाला! ८ दिवसात स्किन चा आजार बरा(! ) झाला म्हणजे तुमचा देव भलता पॉवरफुल होता हो!