हिंदी--उर्दूमध्ये  'झ'ला नुक्ता नसतो. ... झ़बल्यातला झ़ इंग्रजी-मराठीत आहे, हिंदी-उर्दूत नाही.  शुद्ध शब्द माँझी आहे.  महाराष्ट्र शासनाच्या शब्दकोशात 'झ'ला नुक्ता कसा काय दिला आहे, कल्पना नाही.

नेमके हेच म्हणणार होतो, पण म्हटले जाऊ द्या... विषयाची पुरेशी माहिती नसली आणि जाणून घेण्याची प्रामाणिक इच्छा नसली तर 'झ'ला नुक्ता येत असेलही कदाचित... आपल्याला काय माहीत, नाही का?

माँझीचा भूतकाळ हा अर्थ मला माहीत नव्हता.

जालावरील उर्दू शब्दकोशांचा धांडोळा घेता 'भूतकाळ' अथवा 'भूतपूर्व' अशा काहीशा अर्थी 'माज़ी' असा शब्द सापडला. ('ज'ला नुक्ता. 'झ'ला नुक्ता नव्हे! आणि याचा 'माँझी' म्हणजे नावाड्याशी काहीही संबंध नाही.)

कदाचित हाच 'माज़ी' मराठीत 'माजी' बनून येत असावा काय?