कंफर्ट झोन म्हणजे वर्तमानात राहणं, निवांत राहणं.

कंफर्ट झोन सोडण्यापेक्षा तुम्ही तुमच्या दिवसाचं 'काँपोझिशन' बदला असं मी सुचवीन.

तुमच्या दिवसात नवी ऍक्टिविटी आणा, पोहोणं, गाणं, एखाद वाद्य वाजवणं, नृत्य, एखादा खेळ, नवी भाषा शिकणं, नवं कौशल्य आत्मसात करणं, तुमचे (लोकांना उपयोगी होणार असतील तर) अनुभव लिहिणं, पण काही तरी तुम्हाला 'करावं लागेल असं' नुसतं वाचन वगैरे सारखं पॅसिव नाही.

आणि एक करा यात कोणताही आर्थिक निकष आणू नका. या बदलानी तुमचं जीवन बदलायला लागेल. जे तुम्हाला रूटीन वाटतंय त्यात बदल होईल.

एखादा कवी किंवा लेखक उगाच बसल्या जागी कल्पनेच्या भराऱ्या मारतो आणि आपल्याला वाटतं 'ओहो! काय ही स्वच्छंदता'! पण प्रत्यक्षात असं काही नसतं. मी लहानपणापासून अनेक प्रतिथयश लेखक, कवी, नट वगैरे बघीतलेत, बहुतेकांना आर्थिक अडचणी, प्रापंचिक प्रश्न किंवा मग व्यसनाधीनतेनी घेरलेलं असतं, अशा प्रतिभेचा रोजच्या जगायला काही उपयोग होत नाही.

आणि मी म्हणतो तो बदल आज करा, पोस्टपोन करू नका कारण असा बदल करायला कोणताही मुहूर्त लागत नाही, तुमची इच्छा पुरेशी आहे.

हे करतांना श्वासाशी एकसंध अनुसंधान ठेवा, तुम्ही नेहमी कंफर्ट झोनमधे रहाल आणि तुम्हाला आयुष्यात प्रत्यक्ष बदल दिसेल.

संजय 

संजय