उर्दू लिपीत फारसी-अरबी-तुर्की या लिप्यांतून आलेले चार आणि हिंदीतून  आलेला एक असे पाच़  ज़ आहेत. देवनागरीतून लिहिताना पहिले चार  ज़ असे, आणि उरलेला ज असा लिहिला जातो.  पहिल्या चारांतील एका ज़ चा उच्‍चार  Buzzing म्हणजे गुंजारवासारखा आहे.

हिंदी-उर्दूत झ़ नसल्याने इंग्रजीत, हिंदीतला ज़  आणि मराठीतला झ़ या दोघांसाठी z वापरतात. घोटाळा होण्याचा प्रसंग येत नाही. हिंदी-संस्कृत-इंग्रजीतला  झ(झ्य) हा उच्च्‍चार  लिहून दाखवण्यासाठी  बहुधा  jh  किंवा zh असे लिहितात.  Leisure च्या उच्‍चारात झ(झ्य) येतो तर Zambia त झ़.

मराठी भाषाशास्त्रज्ञ म्हणतात की मराठीत च़वळीच्या वर्गातले पाच़ही वर्ण उच्‍चारले  ज़ातात. वत्सला संस्कृतमध्ये वत्‌सला असे उच्‍चारतात, तर मराठीत वत्छला.  यातला छ हा च़वळी  वर्गातला आहे. असाच़ ञ़ ही मराठीत आहे.  झापड(झ्यापड) म्हणजे हिंदीत थप्पड, तर मराठीत झा़पड म्हणजे डोळ्यावर आलेली झो़पेची गुंगी.  मराठीत अर्थात दोन्ही झ आहेत....अद्वैतुल्लाखान