तुमच्या अँगलनी प्रतिसाद देतो, बघा :
>एका अर्थानं तुमचा आनंद शेअर करायला तुम्ही जर जगातली कोणतीही व्यक्ती निवडायची म्हटली तर पहिला पर्याय तुमची पत्नी असते!... असा विचार किती लोक करतात...?.
= मी स्वतः करतो, तुम्ही करून पाहा तुम्हाला मजा येईल. माझं एक वाक्य लक्षात ठेवा, दुसरा काय करतो गौण आहे, तुम्ही काय करता हे महत्त्वाचंय. विवाह निव्वळ कल्पना आहे हा माझ्या पत्नीचा बोध नव्हता, माझा होता, मी तो आमच्या दोघात आणला आणि त्या नात्याला बहुरंगी केलं. तुम्हाला माझं म्हणणं पटलं असेल तर तुम्ही ते रंग तुमच्या जीवनात आणा.
>मला तरी असा कधी अनुभव नाही. आई-वडिल सर्वकाळ ज्यांचे मन व्यापून उरले आहेत, अशा व्यक्तीला आनंदाच्या क्षणी पहिल्यांदा आईची आठवण येईल! लग्न हे आईवडिलांना सुख लाभावं म्हणून केलेली व्यवस्था आणि नंतर स्वतःचा विचार अशीही विचारसरणी असू शकते.
= हे तुम्ही पतीच्या अँगलनी लिहिलंय. स्त्रीला दुसऱ्याचं घर आपलं वाटायला एकमेव आधार तिचा पती असतो अन्यथा ती त्या घरात परकी असते. जी स्त्री पतीचा संपूर्ण स्विकार करते तीच त्याच्या आईवडिलांना सुख लाभावं असा विचार करू शकते आणि मग त्यानाही ती आपली वाटते आणि ते कुटुंब त्या नव्या स्त्रीसह एक होतं.
>वैयक्तीक मतं आणि अनुभव बाजूला ठेवायचे म्हटले तरी लग्न या बाबीला अनेक पैलू आहेत जसे, दोन कुटुंबं, त्यांच्या संयुक्त जबाबदाऱ्या, मुले, सणवार, अर्थार्जन आणि अपेक्षा....
= हे दोन्ही अँगल्सनी सारखंच आहे आणि ते मी पहिल्या प्रतिसादात लिहिलंय
> यात मुळात काही 'समन्वय' वगैरे असलाही तरी तो डायल्यूट व्हायला कितीसा वेळ लागणार...?
= तो समन्वय डायल्यूट होतच नाही, इट इज इंपॉसिबल!
आज मी पंचवीस वर्षांच्या वैवाहिक अनुभवानी तुम्हाला सांगतो आणि माझ्या लेखनातला आनंद साक्षी आहे की मला माझी पत्नी अजून जशीच्या तशी आहे! काय असेल कारण याचं? आमच्यात नातं नाहीये, फक्त सहवास आहे! त्यामुळे सदैव एक अंतर आहे आणि तेच खरं आकर्षण आहे, मला ती हरक्षणी नवीन आहे. मी काही काव्यात्मक जगत नाही. माझी 'लग्न' नावाची कथा इथे प्रकाशित झालीये ती तुम्ही नक्की वाचा, आय हॅव गॉन थ्रू अ हेल ऑफ अ लॉट.
सगळी दुनियादारी करून मी आज या स्थितीला आहे आणि तुमच्या समोर सगळं ठेवलंय, तुम्ही प्रयत्न करा, तुम्हालाही जमेल.
>अर्थात तुमच्या सुरेख (परंतु 'आदर्श सिच्युएशन') लिखाणाचे महत्त्व या गोष्टींनी कमी व्हायचे कारण नाही
= तुम्ही तुमच्या पतीची सखी व्हा माझ्या लेखनाचं सार्थक होईल!
संजय