अक्षरश: निर्वाणीच्या वेळी माझ्या बुद्धीनी अफलातून टर्न घेतला, जर लग्न कल्पना आहे तर डिवोर्स देखील कल्पना आहे! तुम्ही कल्पना करा माझं सगळं आयुष्य स्टेकवर होतं, इतकं सगळं मिळवलेलं एका क्षणात विस्कटणार होतं, माझा देवावरचा विश्वास तर केव्हाच उडालायं, माझ्याकडे फक्त बुद्धी होती, जस्ट वन थिंग, दॅटस ऑल!

माझ्या साऱ्या आकलनाचं सार त्या एका प्रसंगात आहे!

सारी साधना मी या धकाधकीच्या जीवनात केलीये, तुमच्या सारखेच आणि काही अंशी तर तुमच्या सारख्यांच्या आयुष्यात येणार नाहीत असे प्रसंग माझा काही दोष नसतांना आलेत आणि आयुष्य पार कडेलोटाला गेलंय. मला कुणाचा अनुग्रह नाही, कोणतिही परंपरा नाही, माझ्या आकलनावर कुणाचंही शिक्कामोर्तब नाही, सर्व आकलन माझं स्वत:चं आहे आणि माझा बोध त्यामुळेच तुमच्या उपयोगाचा आहे.

तुम्ही 'अनकंडीशनल लव्ह' वगैरेच्या भानगडीत पडू नका फक्त तुमच्या पतीची मैत्रिण व्हा, बास! तुम्ही स्वत:ला त्याच्याशी संपूर्ण मोकळं करा, तो तुमच्या विषयी काय विचार करतो हा प्रश्नच आणू नका, तुम्ही स्वत:ला संपूर्ण ओपन करा, आठवड्याची आवश्यकताच नाही, एका क्षणात तुमची आणि त्याची जाणीव एकरूप होईल, तुम्ही निर्भार व्हाल कारण ती वास्तविकता आहे. एका क्षणात तुम्हाला सगळं हलकं होईल कारण ओझं नात्यांचं आहे, वास्तविक नाहीये, मानसिक आहे! तुमच्या जीवनाचा सारा रंग बदलून जाईल.

येस, आणि तुम्हाला वाटलं तर मला जरूर कळवा.

संजय