जर अशा साथीदाराचा बोध झाला, पण त्याचं नात्यात रुपांतर होणं कठीण असेल, तर तुमच्या मते काय करावं? असं का व्हावं बहुतेक वेळेला की निर्व्याज प्रेम करणारी काही युगुलं "क्रॉस स्टार" घेऊनच जन्माला येतात? का इच्छा असूनही एकत्र होणं नशिबी नसावं? का हे वेगळं होणं हीच पुढील आयुष्यात हातून होणाऱ्या कार्यामागील शक्ती वा प्रेरणा असावी? वा, अल्केमिस्ट या पाउलो कोएलो च्या कथेप्रमाणे, "खजिन्याच्या शोधासाठी" जाणून बुजून अशा नात्यापासून काहीकाळ दूर व्हायचं असतं, पुन्हा कधीतरी पुढे "खजिना" आणि "प्रेम" दोन्ही परत मिळवण्यासाठी?