तुम्ही कवी कल्पनात जगू नका त्या निरूपयोगी आहेत त्यामुळे निर्व्याजप्रेम वगैरे शब्द आलेत प्रत्यक्षात तसं काही नाही. प्रेम ही मानवी कल्पना आहे आणि आख्या मानवतेनी त्यावर अफाट वेळ घालवलांय, आकर्षण ही वस्तुस्थिती आहे.
माणसानी प्रेमाच्या शोधात हजारो वर्ष घालवलियेत कारण त्याची अशी भ्रामक समजूत आहे की प्रेम हा शोध आहे. प्रेम हा शोध किंवा संबंध नाहीये, ती तुमची स्वत:शी झालेली एकरूपता आणि त्यातून तुम्ही दुसऱ्याला, अस्तित्वाला, दिलेला रिसपॉन्स आहे.
मी तुम्हाला सांगतो जो विषय चर्चेत आहे त्याला अनुषंगिक अस्तित्वात फक्त दोनच गोष्टी आहेत, हे आकर्षण आणि एक शून्य स्थिती. आकर्षण ही निसर्गानी केलेली मिलनाची व्यवस्था आहे आणि शून्यता ही सर्व प्रकटीकरणाचा उगम आहे. जस्ट डोंट फूल योरसेल्फ विथ एनिथिंग एल्स.
तुम्ही फक्त आकर्षणाच्या दिशेनी जा तुम्हाला ती भेटेल आणि ती भेटली की प्रेम गवसेल कारण प्रेम हा संबंध नाहीये ती स्थिती आहे, मी ज्याला निर्भार सहवास म्हटलंय त्याचं दुसरं नांव प्रेम आहे!
आता तुमचा प्रश्न :
>जर अशा साथीदाराचा बोध झाला, पण त्याचं नात्यात रुपांतर होणं कठीण असेल, तर तुमच्या मते काय करावं?
= का कठीण आहे ते तर सांगा, जात, सांपत्तिक स्थिती, वयातला फरक, घरच्यांचा विरोध का तुमचाच अंतर्गत संभ्रम? जर तुमचं आकर्षण बेतहाशा असेल तर ते रोखू शकणारी जगात कोणतीही अडचण नाही
>असं का व्हावं बहुतेक वेळेला की निर्व्याज प्रेम करणारी काही युगुलं "क्रॉस स्टार" घेऊनच जन्माला येतात? का इच्छा असूनही एकत्र होणं नशिबी नसावं? का हे वेगळं होणं हीच पुढील आयुष्यात हातून होणाऱ्या कार्यामागील शक्ती वा प्रेरणा असावी? वा, अल्केमिस्ट या पाउलो कोएलो च्या कथेप्रमाणे, "खजिन्याच्या शोधासाठी" जाणून बुजून अशा नात्यापासून काहीकाळ दूर व्हायचं असतं, पुन्हा कधीतरी पुढे "खजिना" आणि "प्रेम" दोन्ही परत मिळवण्यासाठी
= असं कल्पना विश्वात जगू नका तुम्ही चार जणांना दु:खी कराल, एक तुम्ही स्वत:, दोन, तुम्ही तिच्याशिवाय निवडाल ती व्यक्ती, तीन, जी तुम्हाला आवडली होती पण तुम्ही निवडली नाही ती सखी आणि चार, तिचं मन तुमच्याशी लागल्यानी तिचा पती!
- पाउलो कोएलोची अल्केमिस्ट भ्रम आहे "खजिना" आता इथे तुमच्या समोर आहे, जी तुम्हाला आवडलीये तो खजिनाये!
-"खजिन्याच्या शोधासाठी" जाणून बुजून अशा नात्यापासून काहीकाळ दूर व्हायचं असतं... ही पाउलोनी जगाची केली दिशाभूल आहे
-पुन्हा कधीतरी पुढे "खजिना" आणि "प्रेम" दोन्ही परत मिळवण्यासाठी... जर संधी हुकली असेल (आणि ज्यांची हुकली असेल) त्यांना आता फक्त एकच पर्याय आहे जी निवडली आहे तिच्याशी संपूर्ण समग्रतेनी एक व्हा, कारण जी निवडली नाही ती तुमच्या स्मृतीशिवाय कुठेही नाही आणि जी जगायला, उपभोगायला, शेअर करायला आणि उत्सव साजरा करायला मिळालीये ती तुमच्या समोर आहे!
संजय