सावरकरांनी निर्मिलेल्या 'वैनतेय' या वृत्तात यमक असतेच असे नाही. अनेक ओळींचा अर्थ पुढील ओळीतील शब्द वाचल्यानंतर लागतो. नेहमीच्या कवितांप्रमाणे वाचता येत नाहीत. त्यामुळे कदाचित ते वृत्त लोकप्रीय झाले नसावे. असे वाचले आहे की या वृत्तातील कविता विशिष्ट पद्धतीने म्हणावी लागते म्हणजे या वृत्ताचे खरे सामर्थ्य स्पष्ट होते. ही पद्धत सावरकरी वक्तृत्वाच्या अंगाने जाणारी असते. याबाबत कांही माहीत असेल  अशा व्यक्तिची/सीडीची/या वृत्तातील गाण्याची  जर कोणास माहिती असेल तर प्रतिसाद देण्याची विनंति.