संस्थळावर जाऊन पाहिले. आसपासच्या एकदोन संस्थळांसारखेच वाटले. अर्थात वेगळेपणा आणून आणून किती आणणार? लेखक आणि प्रतिसादक इकडून तिकडून तेच असतील तर स्पर्धा वाढेल पण दर्जा वाढेल की नाही याबद्दल साशंकता वाटते. अर्थात संस्थळावर येणारे साहित्य आणि भविष्यकाळच ते ठरवील.असो‌‌. स्पर्धेमुळे एकाधिकार कमी होऊन ग्राहकहित (जालकहित?) साधले जावो आणि एकंदर मराठी जालविश्व समृद्ध होवो ही इच्छा आणि प्रार्थना.