असं वाटतं. तुम्ही जरूर विचार करा.
१) मासिकाला मूल्य ठेवलं जावं आणि लेखकांना मानधन मिळावं म्हणजे साहित्यिक दर्जा उत्तम राहिल.
२) व्य. नि. ची सोय मेलमुळे रिप्लेस झालीये त्यामुळे प्रतिसाद देणाऱ्यांना आणि लेखकांना त्यांचा मेल आयडी देण्याचा पर्याय दिला की झालं, तेवढाच संकेतस्थळाच्या डेटाबेसचा लोड कमी होईल
३) अंक खरेदी केल्यानी वाचकांचं अंकाच्या साहित्यिक मूल्यावर आणि वाचनियतेवर जबरदस्त नियंत्रण राहिल आणि प्रशासनाला वाचकांचे प्रतिसाद आणि अंकाचा खप यावरनं साहित्याची निवड, उपक्रमशिलता, अंकाची आकर्षकता याविषयी सतत जागरुक राहावं लागेल.
४) आज जे मराठी संकेतस्थळांचं स्वरूप दिसतं त्यावरनं वाटतं कुणीही काहीही लिहावं आणि लोकांनी निव्वळ टाइमपास म्हणून मनमानी प्रतिसाद द्यावे, संकेतस्थळावर दर्जेदार किंवा माहितीपूर्ण असं आभावानीच वाचायला मिळतं. त्यातून टोपण नांवाच्या उपयोगामुळे तर संकेतस्थळांवर प्रकाशित होणाऱ्या साहित्य आणि प्रतिसादांची विश्वासार्हता अत्यंत न्यून आहे हे मी माझ्या व्यक्तीगत अनुभवानी निर्विवादपणे सांगतो.
५) जर अंकाचा खप लक्षणीय झाला तर जाहिरात वगैरे पर्याय उपलब्ध होऊन उपक्रम व्यावसायिक दृष्टीनी यशस्वी होईल आणि मराठीत खरंच काही तरी दर्जेदार साहित्य निर्मिती होईल.
संजय