हे ठमीचं खरं नाव आहे. अर्थातच ठमी हे तिचं टोपणनाव.
मेहरुन्निसा या शब्दाचा शब्दश: अर्थ आहे स्त्रियांमधला सूर्य. ग्रहांमध्ये जसा सूर्य तेजस्वी दिसतो तशी इतर स्त्रियांमध्ये तेजस्वी दिसणारी स्त्री म्हणजे मेहरुन्निसा.
डबडबलेल्या डोळ्यांनी ती निघून जाताना तिला खऱ्या नावाने हाक मारून थांबवण्याचा प्रयत्न करताना कथानायकाच्या मनातल्या अव्यक्त भावनांबरोबरच त्यांच्या दोघांच्या नात्याचे भवितव्यही या हाकेतून प्रतीत होते असे मला वाटते.