श्री. विनायक,
आपला दुसरा मुद्दा म्हणजे जर्मनी, फ्रान्स, रशिया, जपान, चीन या देशांचे काय?यापैकी जर्मनी, फ्रान्स, स्वीडन यांच्यासारखे देश इंग्लंड इतकेच (किंबहुना जास्तच) शास्त्रीयदृष्ट्या प्रगत होते. त्या काळातील गणिती, भौतिकशात्रज्ञ, रसायनशास्त्रज्ञ यांची यादी पाहिली तर त्यात वरील ३ देशातील लोकांचा भरणा जास्त दिसेल. न्यूटननंतर इंग्लंडमध्ये गणित वगैरे बाबतीत प्रगती थंडावली, त्यामानाने इतर देशात ती जास्त झाली. अशी परिस्थिती भारतात झाली असती असे म्हणायला काही आधार आहे असे मला वाटत नाही.
वैद्यक क्षेत्रात आपले आयुर्वेद सक्षम होते. (आजही आहे.)
फिजीकल आणि मेंटल फिटनेस साठी आजही खूपजणं 'योगा'कडेच वळत आहेत. गणितात '०' भारताने दिला अशी माझी 'ऐकिव' माहीती आहे. ज्योतिष शास्त्रात ग्रहताऱ्यांचे महत्व भारतीय वैज्ञानिकांनी जाणले. कालगणनेतही 'अधिक' मासाचे प्रयोजन काय दर्शवते? नीट विचार केला तर अशी अनेक उदाहरणे देता येतील.
एका युरोपिअन बाईचा अनुभव विचार करण्या सारखा आहे. ती बाजारात विकण्यासाठी घरगुती जॅम बनवायची. तिचे जॅम कधी खूप टिकायचे तर कधी लवकर खराब व्हायचे. तिने त्यातील घटकांचे प्रमाण बदलून पाहीले तरी फरक पडला नाही. तिला याचे कारण सापडेना. शेवटी एकदा सहज, भारतिय ऋतु आणि काळावर लेखन तिच्या वाचनात आले. त्यात ठराविक दिवशी, ठरविक वातावरणात केलेले मुरंबे वर्षभर टिकतात असा उल्लेख आला. तिने त्या नुसार तिच्या देशातील समांतर ऋतूत ठराविक दिवशी तो प्रयोग करून बघितला असता तिला जॅम सर्वात जास्त दिवस टिकल्याचे आढळून आले. (प्रस्तुत लेखात ते दिवस कुठले आणि वेळा कुठल्या हे दिलेले आहे, आता मला स्मरत नाही). आपली शास्त्रेही प्रगत होती.
मला मान्य आहे पश्चिमेत अनेक संशोधक होऊन गेले. तसे योगदान आपल्या वैज्ञानिकांचे नसेलही परंतु, भारत-अफगाणीस्तान तुलना मला पटत नाही.
तसेच इंग्रजांमुळे आपल्याला ज्ञान प्राप्त झाले हेही पटत नाही. अशा विधानात तथ्यांश असला तरी ते पूर्ण सत्य नाही. इंग्रजांकडून आपल्याला आधुनिक व्यवस्थापन, आधुनिक समाजकारण शिकायला मिळाले असे मला वाटते.