आपला प्रतिसाद अगदी योग्य आहे हा आग्रह फक्त स्त्रियांच्याच पोषाकाबाबतीत आहे असे नाही.व्यक्तिस्वातंत्र्य म्हणून अगदी
पुरुषानेही अंगात केवळ बनियन व चड्डी घालून फिरणे योग्य वाटणारच नाही आणि वर्गातील मुले असा पोषाक करून आली
तर कदाचित शिक्षिकांचे मन विचलित होणार नाही पण त्याना तिटकारा मात्र नक्की वाटेल. आणि तसे झाल्यास मुलांनीही
कसा पोषाक करावा याचा आग्रह शाळांचे व्यवस्थापन धरेल. मागे सौरव गांगुलीने मॅच जिंकल्यावर आपल्या अंगातील शर्ट
काढून फिरवला तेव्हां त्याच्यावरही टीका झाली होती. त्यामुळे स्त्रियांनी आखूड कपडे घालू नयेत असा आग्रह धरणारा समाज आपल्या व्यक्तिस्वातंत्र्यावर आक्रमण करतो असा ओरडा करणे योग्य नव्हे.समाजात वागताना काही कमीतकमी
अपेक्षा समाजाने ठेवल्या तर त्यांचे पालन करणे हेच इष्ट होय.