आहे.
खमंग लिखाणाची अपेक्षा होती त्यामुळे लेखिकेला अपेक्षित नसलेले वाह्यात विनोद नजरेत भरले आणि भरपूर करमणूक झाली.
विषयाचा गाभा मात्र विचारप्रवर्तक आहे. सुखाची किंवा सुख लुटण्याची म्हणजे मजा करण्याची व्याख्या व्यक्तिसापेक्ष असते. परंपरावादी नसलेल्या पतीला ज्या वेळी साखरझोप घेणे ही सुखाची परिसीमा वाटत असते त्याच वेळी पहाटे उठून दिवाळी परंपरागत पद्धतीने साजरी करणे हे पत्नीला सुखावह वाटत असते. पत्नीला खूष पाहून नंतर पतीही खूष होतो. न होऊन सांगतो कोणाला बिच्चारा. बंडूचे विचार वेगळे असू शकतात. असे अनंत वेगवेगळे विचार मनांत सैरावैरा पळू लागले.