तुमच्या नेहमीच्या शैलीतील नर्मविनोद असला तरी लेख तसा हलकाफुलका नाही.
दिवाळी पारंपारिक पद्धतीने साजरी करणे सध्या शक्य आहे का? नरकचतुर्दशीला सूर्योदयापूर्वी स्नान व्हायला पाहिजे असा नियम/पद्धत होता/होती. ते आता होऊ शकेल का? पूर्वी चकल्या, करंज्या हे पदार्थ अगदी सुखवस्तू कुटुंबांमध्येही दिवाळीत किंवा घरात कार्य असेल तर केले जायचे. आता बारा महिने हे पदार्थ घरोघर असतात किंवा बाजारातही चांगले मिळतात. तेव्हा ते अप्रूप आता राहिले नाही.  पूर्वीसारखा घरी किल्ला करणे आता शक्य आहे का? तेव्हा घरात जर दोन किंवा तीन पिढ्या असतील तर एकाने थोडे पुढे जाऊन आणि दुसऱ्याने थोडे मागे येऊन सुवर्णमध्य साधणे सर्वांनाच सोयीचे होते. अर्थात हेही तितके सोपे नसते पण तसे केले तर थोडेसे तरी मनःस्वास्थ्य मिळते.