विज्ञानेतर क्षेत्रातील तरुण पिढीला होमी भाभांविषयी काहीच माहिती नसते. या लेखाद्वारे ती होऊ शकेल.

लेखात योजलेले काही मराठी शब्द नव्याने समजले आणि आवडले. उदा. क्लाउड-चेंबर साठी योजलेला मेघकक्ष हा अतिशय सुरेख आणि समर्पक शब्द. आजकालची भारतीय विद्यापीठे आणि संस्था यांच्या स्थिती विषयी लिहिताना वापरलेला 'कमजोर' हा शब्दही आवडला. त्याजागी अशक्त, दुर्बळ हे शब्द चपखल ठरले नसते असे वाटते. कमजोर, कमकुवत हेच शब्द योग्य होते. असो.

एकदोन किरकोळ त्रुटी जाणवल्या. त्यातली एक म्हणजे सर दोराबजी ज. टाटा हे जर भाभा यांच्या आत्याचे पती असतील तर मराठी भाषेत त्यांचे नाते काका-पुतण्याचे होत नाही.  इंग्रजीत अंकल हा शब्द अशा तऱ्हेच्या सर्वच नात्यांना वापरला जातो,त्याचा कदाचित परिणाम असावा. दुसरी म्हणजे भाभा यांच्यामधले कलाकाराचे व्यक्तिमत्व या लेखात समर्थपणे प्रकट झालेले नाही. चित्र-शिल्प-संगीत या विषयांवरचे त्यांचे प्रेम, त्यांचा कलासंग्रह, उदयोन्मुख कलाकारांना त्यांनी दिलेला व मिळवून दिलेला आश्रय,पर्यावरण, वनस्पती याबाबतची त्यांची आस्था,टी.आय.एफ़.आर. भोवती त्यांच्या प्रेरणेने उभे झालेले उद्यान याबाबत थोडी अधिक माहिती लेखात यायला हवी होती असे वाटते.