इलेक्ट्रॉन = विजक तर ऋणक का नाही?>>> हो. ऋणक शब्दही योग्यच आहे.

पॉझिट्रॉन = धन-विजक.

'आण्विक वस्तुमान' आणि 'आण्विक वस्तुमान एकक' या दोन्हीसाठी आमच्या काळी अणुभार असा एकच शब्द वापरला होता. >>>>
आण्विक वस्तुमान म्हणजे अणुभारच. तुमच्या काळचाच शब्द आजही प्रचलित आहे. एकक म्हणजे युनिट. ऍटोमिक मास युनिट म्हणजे 'आण्विक वस्तुमान एकक'.

आपण बरीच पुस्तके संदर्भासाठी वापरली असतील. मग आणखी एक वापरायला काय हरकत होती? >>> काहीच नाही. सुचवा. मी अवश्य वाचेन.

मराठी भाषेतून उच्च शिक्षण उपलब्ध व्हावे ह्याकरता मी कटिबद्ध आहे.
संपूर्ण विज्ञान व तंत्रज्ञान मराठीत उतरवण्याकरता मी कटिबद्ध आहे. मला मदत करा!