मी हा लेख लिहिल्यावर पहिल्यांदा पत्नीला वाचायला दिला! ती म्हणाली आता इतरांचे प्रतिसाद आल्यावर मी अभिप्राय देईन! स्त्रिया सहज प्रतिसाद का देत नाहीत याचा मला अद्याप उलगडा झाला नाही. आपण ती सुरेख दिसत असेल तर लगेच तारीफ करून मोकळे होतो, साधी भाजी चांगली झाली तरी कौतुक करतो, इनिशिऐटिव नेहमी पुरुषाचा असतो आणि मजा अशीये की विवाह सहजीवनाचा सोहळा आहे. मला सर्वांना सांगावसं वाटतं की चांगल्या गोष्टींचं ऍप्रिसिएशन सहवासाची रंगत वाढवतं याची दखल घ्यायला हवी. कधी कधी वाटतं की रिस्पॉन्स न दिल्यानी चांगल्यातले चांगले प्रसंग साकार होऊ शकत नाहीत.

मला खरं तर स्त्रीच्या दृष्टीकोनातून हा विषय कसा आहे याचं कुतुहल आहे. 

संजय