लेख वाचून अनेक आठवणी जाग्या झाल्या. कॉलेजात असतांना बापट सरांनी जास्तीची व्याख्याने देऊन या विषयाला भरपूर वेळ दिला होता. तेव्हाच्या आमच्या टिक्काटिप्पण्या आठवल्या. बीटा कणांना जास्त वाह्यात मुलांची, आल्फा कणांना कमी वाह्यात मुलांची आणि गॅमा कणांना शांत अशा सरळ अभ्यासू मुलांची उपमा त्यांनी दिली होती.
आमचा वर्ग सर्वात वाह्यात वर्ग म्हणून कुप्रसिद्ध होता. याच सरांना आम्ही दोन वर्षे भंकस करून अतोनात त्रास दिला होता. पण ते मुलांची मस्ती मनावर घेत नसत. अति मस्ती करूनही कधीही त्यांनी कोणालाही शिक्षा केली नव्हती. दुसऱ्या एका सरांनी मात्र एखादे प्रकरण न शिकवणे, जर्नलवर वाईट शेरे देणे, जर्नलला गुण कमी देणे वगैरे शिक्षा केल्या होत्या. असो. ज्ञान आणि मनोरंजनाबरोबर अनेक मधुर स्मृती जाग्या झाल्या. धन्यवाद.