'वरदा' यांचा प्रतिसाद अत्यंत संतुलित आहे. स्त्रि-पुरुषांमधील परस्परांविषयीचे आकर्षण निसर्गदत्त आहे. क्रिकेटचा खेळ हीच मुळी एक मोठी करमणूक असूनही तेथे 'चिअर गर्ल्स' कशासाठी आणल्या जातात? जाहिरातींमध्ये जाहिरातीकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी तोकडे कपडे वापरले जातात ना? त्यामुळे '' इतरांनी आपापल्या मनांना विचलित होऊ देऊ नये असे म्हणणे सोपे असले तरी इतरांचे मन विचलित होत असते ही वस्तुस्थिती आहे. '' या वरदा यांच्या म्हणण्यात खूप सत्य आहे. त्या आकर्षणाचे अतिभ्रष्टाचारी रानटी रूप म्हणजे 'बलात्कार', की जो जास्तीत जास्त शिक्षेस पात्र केला गेला पाहिजे. हा त्यावर एक उपाय होऊ शकतो. 'स्लट वॉक ' मुळीच नाही. पुरुषप्रधान संस्कृतिमुळे व त्यातून तयार झालेल्या समाजाच्या मानसिकतेमुळे, विचलित झालेला पुरुष आज या अतिरेकापर्यंत तुलनेने सहज जात असेल. उद्या स्त्रिप्रधान संस्कृती आली तर कुशाग्र म्हणतात त्याप्रमाणे "पुरुषांच्या शर्ट-प्यांट, पंचा-धोतर-टोपी, सदरा-कमीज-लेहेंगा-शेरवानी, लुंगी-मुंडू-वेष्टी यांची लांबीरुंदी किती असावी यावरही लवकरच वाद झडोत " ही शुभेच्छा प्रत्यक्षात येईलही.