मला एक कुतूहल आहे. इथे या प्रश्नाचे उत्तर कोणास माहित असल्यास अवश्य द्यावे.
आदिवासी संस्कृतींमध्ये स्त्रिया केवळ लज्जारक्षणापुरतेच कपडे घालताना दिसतात. किंवा छातीचा भाग जेमतेम झाकून कमरेला फक्त अधरीय घातलेल्या/ गुंडाळलेल्या दिसतात. (आठवा, अंदमान निकोबार, आफ्रिकन आदिम संस्कृती इ. इ. ) तर तिथे त्या स्त्रियांना तसे पाहून त्यांच्या वा अन्य संस्कृतींमधील लोकांचे मन विचलित वगैरे होते का? आता असे नियम लागू केले तर ज्या स्त्रियांकडे लज्जारक्षणासाठी पुरेसे कपडे नसतात वा त्यांना ते परवडत नाहीत (आठवा ओरिसा, आसाम, पश्चिम बंगालच्या अंतर्भागातील स्त्रिया) त्याही पुरुषांचे मन / लक्ष विचलित करतात का? त्यांनाही याच नियमांनी तोलायचे का?

उदा : दुवा क्र. १

दुवा क्र. २