प्रवासी,

माझ्याकडेपण लोखंडी तवा नाही, निरलेपचाच आहे. गॅसशी शेगडी किंवा विद्युतशेगडी यावर तापमान अवलंबून आहे. गॅसच्या शेगडीवर तवा पटकन तापतो, विद्युतशेगडीवर तापायला वेळ लागतो. पोळी सर्वात चांगली निरलेप तव्यावरच भाजली जाते, असे निरिक्षण आहे. लोखंडी अथवा अन्य धातुचा तवा मला तरी अजिबात आवडत नाही. हे तवे खोलगट असतात, त्यामुळे पोळीला सर्वबाजुने सारखी आच लागत नाही.

थोडक्यात पोळी भाजताना  विशिष्ट तापमान सतत व सर्वबाजुने सारखे असणे महत्वाचे म्हणजेच मध्यम आचेवर असणे.

रोहिणी