ह्या लेखनातील कुठले प्रतिशब्द तुम्ही रूढ मराठी प्रतिशब्दांचा अभ्यास करून ते समाधानकारक न वाटल्याने स्वतः घडवले ते सांगावे.. रूढ प्रतिशब्द का पसंत नव्हते तेही सांगावे.
प्रचलित मराठी प्रतिशब्द घेतले असल्यास ते कोठून घेतले तेही (शक्य असल्यास) कळवावे.
तुम्ही घडवलेल्या कोठल्या प्रतिशब्दांबद्दल तुम्हाला अद्याप असमाधान आहे आणि वाचकांकडून सुचवणीची अपेक्षा आहे ते कळवावे
शिवाय नवे प्रतिशब्द घडवताना जर काही पर्याय नको म्हणून आधीच बाजूला सारलेले असतील तर ते का बाजूला सारले तेही कळवावे.
(म्हणजे त्या शब्दांचा विचार प्राधान्याने करता येईल), असे सुचवावेसे वाटते.