शेवटून दुसऱ्या परिच्छेदात आपण 'काही अणू क्षतिग्रस्त होतात' असा वाक्यांश टाकला आहे. आपणास 'काही (मानवी) पेशी क्षतिग्रस्त होतात' असे म्हणायचे होते काय?

अर्धायू हा शब्द 'हाफ-लाइफ' या संज्ञेचे मराठीत अर्थवहन करतो खरा पण याच कुळातले चिरायू, अल्पायू, दीर्घायू हे शब्द 'अल्प/चिर/दीर्घ आयू असलेला' अशा अर्थाने विशेषणे आहेत. आपण मात्र अर्धायूचा प्रयोग नामाप्रमाणे केला आहे. थोडासा अर्थभंगाचा धक्का बसतो. वैज्ञानिक परिभाषा ही सोपी हवी तशीच काटेकोरही हवी. एखाद्या शब्दावरून भविष्यात अनेक शब्द घडवावे लागण्याचा संभवही असतो. त्या दृष्टीने मूळ शब्द विस्तारशील असावा; त्यापासून अनेक शब्द बनवता येण्याची सोय असावी.