प्रोटेक्टिव शील्ड या शब्दासाठी सुरक्षाकवच हा शब्द मराठीत रूढ आहे. अर्थात दोन्ही शब्दांत सूक्ष्म अर्थभेद आहेच. कवच या शब्दाने 'चोहो बाजूंनी सुरक्षा, सुरक्षिततेसाठीची (अंगालगतची)वर्तुळाकार व्यवस्था' असा काहीसा अर्थबोध होतो तर ढाल म्हटल्यावर 'एकाच बाजूने सुरक्षिततेची व्यवस्था' असे वाटते. अर्थात शील्ड साठी ढालच योग्य. सुरक्षाकडे असाही शब्द रूढ आहे. त्यातूनही रक्षितव्य/रक्षणीय वस्तूपासूनचे अंतर प्रतीत होते.