पूर्वीच्या बायका (जवळच्या नातेवाईक बायका) सर्रास बेंबीखाली साडी नेसायच्या, पारदर्शक साड्या किंवा स्लिवलेस ब्लाऊज घालायच्या,, मोठ्या गळ्याचे ब्लाऊजही,,, तेव्हा त्यांचे नवरे 'असा पेहराव करायचा नाही ' असा ओरडा केलेला ऐकीवात नाही.

अमेरिकेत पोषाखाकडे कोणीही लक्ष देत नाही,,, आणि अमेरिकन पुरुष अमेरिकन बायकांकडे कोणत्याही वाईट नजरेने बघत नाहीत,, याउलट भारतात ट्रेनमध्ये बायकांच्या डब्याच्या शेजारी जो पुरुषांचा डबा असतो त्यांच्या नजरा 'बाई' हा प्राणी कधीच पाहिला नाही या नजरेने पाहत असतात अगदी त्या बायकांचा अंगभर पेहराव असला तरीही,, अपवाद आहेत.

पंजाबी ड्रेस, सलवार कुडता आणि दुपट्टा या फॅशनमुळे इतर सर्व अंगप्रदर्शन करणाऱ्या फॅशन दूर झाल्या हे एका अर्थी चांगलेच झाले,, हा एक अंगभर ड्रेस आणि सहज वावरायला सोपा ड्रेस आहे,, तसेच शर्ट जीन्सही अंगभर व सहज वावरायला सोपा ड्रेस आहे.

अर्थात ज्यांना फॅशन करण्याची आवड आहे ते सर्व , त्यातही पारदर्शक, स्लिवलेस, जीन्सही बेंबीखाली घालणे असे प्रकार करतच असतात,, अर्थात ही ज्याची त्याची मर्जी,,

केवळ अंगभर पोषाख न केल्याने बलात्कार होतात किंवा त्याचे प्रमाण वाढते हे तितकेसे पटत नाही,, बलात्काराची कारणे वेगळी असावीत असे वाटते,

लक्ष वेधण्यासाठी अंगप्रदर्शन करणारे पेहराव का करतात याचे कारण काही कळाले नाही,, काही जणी असेही म्हणताना ऐकले आहे की आम्ही कोणत्याही प्रकारचा पोषाख करू (दोष तुमच्या दृष्टीतच आहे) असो.