एखाद्या शब्दावरून भविष्यात अनेक शब्द घडवावे लागण्याचा संभवही असतो.
नेमका मुद्दा.
इतकेच नव्हे एखादा प्रतिशब्द भाषेत निरनिराळ्या संदर्भात (नामाचे वचन बदलून, क्रियापदाची रूपे करून, विशेषण म्हणून, क्रियाविशेषण म्हणून इ.) कसा वापरला जाईल त्याचा जास्तीत जास्त विचार व्हायला हवा, असे मला वाटते. (माझा हा मुद्दा सर्वसाधारण आहे. वरील लेखनाशी संबंधित असेलच असे नाही. )
मनोगतावर अनेकजण सुचलेल्या / न सुचलेल्या शब्दांची वैज्ञानिक लेखन करण्यापूर्वी वेळोवेळी चर्चा करतात, ती पद्धत योग्य वाटते.