मी बातमीचा उल्लेख करताना कोणाचीच बाजू बरोबर आहे असे मत व्यक्त केलेले नाही फक्त स्त्रियांनाच असे पोषाक का घालावे वाटतात अस प्रश्न शेवटच्या दोन वाक्यात विचारला आहे व त्याला योग्य उत्तर कोणी दिले नाही.
        कालचीच गोष्ट! सध्या मी अमेरिकेत असल्यामुळे व येथे हिमवादळ झाल्यामुळे अगदी एकावर एक कपडे घालूनही कुडकुडतच होतो पण त्याचवेळी शेजारचे गृहस्थ काही कारणासाठी आले. त्यानीही अंगात गरम कपडे घातले होते पण त्यांच्या पत्नीने मात्र गळा बऱ्यापैकी उघडा राखणारा ब्लाउज घातला होता. यावरून आता मीच असा तर्क करतो की व्यक्तिस्वातंत्र्य म्हणून नव्हे तर स्त्रियांना नेहमीच  फार उकडत असावे त्यामुळे उगीचच अनावश्यक कपडे घालण्याची जरुरी त्याना वाटत नसावी त्यामुळे त्या असे कपडे घालत असाव्या..