एका मैत्रिणीशी या विषयावर चर्चा करत असताना मी "कदाचित पुरुषांचे लक्ष वेधून घेण्याकरता अंगप्रदर्शन करणारे कपडे घालणे ही स्त्रियांची नैसर्गिक प्रवृत्ती असावी का? " असे म्हटले. तिचे मत होते की इतर प्राण्यांमध्ये मादीचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न नर करतात, त्यामुळे स्त्रियांची ही नैसर्गिक प्रवृत्ती समजता येणार नाही. मग असे कशाने झाले असावे यावर तिचा तर्क होता की असे पुरुषप्रधान संस्कृतीमुळे झाले असावे. यात तथ्य वाटते.

वर कोणीतरी नायर किंवा आदिवासी समाजातल्या स्त्रियांच्या वस्त्रांचा उल्लेख केला आहे. त्यांचे कपडे अंग झाकणारे नसले तरी तशी वेषभूषा ही मुद्दाम पुरुषांचे लक्ष वेधून घ्यायच्या उद्देशाने केलेली नाही हे सहज लक्षात येते. या दोन्ही समाजात पुरुषप्रधान संस्कृती नसल्याने हे होत असावे का? नायर समाजात मातृसत्ताक पद्धत आहे हे नक्की माहिती आहे. आदिवासी समाजातही पुरुषप्रधान संस्कृती नाही असे वाचले आहे.

विनायक