घराबाहेर बारा - चौदा तास राहणाऱ्या, कामापायी रोज असंख्य प्रकारच्या तणावांना झेलणाऱ्या बंड्यासारख्या तरुणांना आपले सुट्टीचे दिवस तरी कोणत्याही गोंधळाशिवाय, आपल्या मर्जीनुसार घालवायचं स्वातंत्र्य असायलाच पाहिजे, नाही का? की तिथेही आपल्या आशा - अपेक्षांचं ओझं त्यांच्या माथी मारायचं? - महत्त्वाचा प्रश्न आहे.
जागतिकीकरणाच्या रेट्यात गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर न पडलेल्या भारताची भूमिका ओघानेच 'चीप लेबर सप्लायर' अशी झालेली आहे. त्यामुळे पाश्चात्य देशातल्या ग्राहकाने कटकटीची कामे 'आउटसोर्स' करायची, आणि ती उरावर घेऊन गुरासारखे राबताना इथल्या तरूणाईनी सणासुदीची कामे 'आउटसोर्स' करायची असा हा खो खो चा खेळ आहे.
जुन्या प्रथा, परंपरांचे गतानुगतीकपणे भाबडे अनुकरण करणे आणि उगाचच आपण फार मोठे काहीतरी बंडखोर, क्रांतिकारक, बुद्धीवादी महत्कार्य करतो आहे असा आविर्भाव आणत आपल्या पूर्वजाना सरसकट मूर्ख ठरवत त्या वावदूकपणे मोडीत काढणे ही दोन्ही टोके न गाठता आपल्या समाजात काळानुसार सण, धार्मिक विधी यांचे बाह्यस्वरूप बदलत राहिलेले आहे. त्यादृष्टीने सकारात्मक प्रयत्न सतत चालूच असतात (उदा. ज्ञानप्रबोधिनी ने या दृष्टीने केलेले प्रयत्न). धर्माच्या मूळ 'फ्रेमवर्क' मध्येच अर्थपूर्ण प्रतिकात्मता आणि बराच लवचिकपणा आहे असेही मला वाटते. असो. लेख आवडला.