संजयजी,

स्त्रिया चटकन प्रतिसाद देत नाहीत हा तुमचा चुकीचा समज आहे. किंबहुना त्याच तर जास्त 'रिऍक्टिव्ह' असतात.

विवाह ह्या इतक्या व्यापक विषयावर खरंच स्त्री आणि पुरुष या दोन्हीही बाजूंनी वेगवेगळी मते-अभिप्राय अपेक्षीत आहेत.

 शेवटी प्रत्येक जण त्याची मतं-अपेक्षा ह्या आजूबाजूच्या लोकांकडे पाहून, मित्र मैत्रीणींचे अनुभव बघून, काही पुस्तकांतून वाचून आणि काही स्वतःचा विचार करून असाच ठरवीत असतो ना! आणि सहवासाने आपलीही मतं बदलतात- त्याच्या सारखी होतात -असा माझा 'ऍडाप्टेबिलिटी' चा अनुभव आहे! ज्या गोष्टी मला पूर्वी अजिबात आवडायच्या नाहीत त्या आता मी 'मिस' करते...!

(उदा-पाहुणे!  )

प्रतिसाद वैयक्तीक होण्याच्या भीतीने अधिक नाही लिहीत!