भारतात घरी, दारी, बाजारी, रस्त्यावर पुरुषांना अतिशय कमी कपड्यांत वावरण्यास काहीच आडकाठी नाही व नसते. सर्व प्रकारच्या ऋतूंमध्ये, हवामानात केवळ शॉर्टस वर वावरणारी किंवा फक्त पंचा घालणारी, कमरेला फक्त लुंगी/ टॉवेल गुंडाळून हिंडणारी अनेक मंडळी दिसतील. अगदी थंडीतही. त्यांनाही बहुधा खूपच उकडत असावे असे दिसते. आणि भर उकाड्यात पायघोळ, अंगभर बुरखा / पल्लू/ घुंगट/ पदर / ओढण्या घालून जाणाऱ्या स्त्रियाही दिसतील. त्यांना बहुधा खूपच थंडी वाजत असावी, असेच म्हणावे लागेल.