स्त्रियांनाच असे का वाटावे हा प्रश्नच होऊ शकत नाही कारण भारतात पुरुष तर परंपरागत आणि सहजरीत्या असे तोकडे कपडे घालत आलेले आहेत.
मध्यपूर्वेत स्त्रीपुरुष दोघेही कफ्तान सदृश सैल झगा घालतात. अफ्गाणिस्तानात स्त्रीपुरुष दोघांचाही पोषाख साधारणपणे सारखा असतो.इराणमध्ये बायकांना चादोर नावाचे एक अतिरिक्त वस्त्र पांघरावे लागते. राजस्थानात स्त्रिया पदर समोरून घेत नाहीत. डोक्यावरून पाठीवर सोडतात. त्यांच्या चोळ्या बंदांच्या असतात.बायकांच्या पाठी व पोट उघडे असणे हे त्यांच्यामध्ये (व आपल्याकडेही) सहज असते.
खोल गळ्याचे ब्लाउज घालणे हे अमेरिकेत तरी सहज होते. ना कोणी अशा स्त्रियांकडे टक लावून पाहात की ना कोणी त्यांना नावे ठेवीत.
प्रत्येक देशातले नैतिकतेची आणि नीतिमत्तेचे मापदंड वेगवेगळे असतात.
मुले आणि मुली या दोघांनाही शर्ट-पँट असा एकच गणवेश ठेवला तर प्रश्न काही अंशी सुटू शकेल.