स्त्रीने कोणते कपडे घालावेत व पुरुषाने कोणते कपडे घालावेत, त्यात फरक असावा की नसावा हे कोणी ठरविले? कधी ठरविले? कोणत्या काळात ठरविले? जन्मतः स्त्री व पुरुष अमुक प्रकारचीच वस्त्रे घालायची हे ठरवून किंवा तशी वस्त्रे घालून येतात का? या प्रश्नांची उत्तरे पाहिलीत तर त्यातील गोम लक्षात येईल.

नीता यांनी चुकून उलटे म्हटले आहे का?
कारण माझ्या समजाप्रमाणे किंवा अल्पज्ञानाप्रमाणे प्राणीजगतात नर हा मादीस आकृष्ट करून घेण्याचा प्रयत्न करतो. उदा : मोर - लांडोर, कोकिळ, कुत्रे, बोके वगैरे.... दोन नरांमध्ये मादीसमोर श्रेष्ठ/ बलिष्ठ कोण हे ठरविण्यात झुंज होते वगैरे वगैरे. जो बलिष्ठ ठरतो तो जिंकतो. आदिम समाजातही काही ठिकाणी अशाच प्रथा दिसतात. मग येथे कोण कोणाला आकृष्ट करायचा प्रयत्न करते?