स्त्रीने कोणते कपडे घालावेत व पुरुषाने कोणते कपडे घालावेत,  त्यात फरक असावा की नसावा हे कोणी ठरविले?  कधी ठरविले?  कोणत्या काळात ठरविले?  जन्मतः स्त्री व पुरुष अमुक प्रकारचीच वस्त्रे घालायची हे ठरवून किंवा तशी वस्त्रे घालून येतात का?

अरुंधतीताई, स्त्री किंवा पुरुषांचे कपडे कोणी आणि केव्हा ठरवले हे मला माहित नाही पण माझ्या लहानपणापासून मी हेच बघत आले आहे की त्यात फरक असतोच. तुम्ही हे दृष्य डोळ्यांसमोर आणून बघा की पुरुषी वेषातली मुलगी आणि स्त्री वेषातला मुलगा कॉलेजमधे चालले आहेत. मुलगी डोळ्यांना कदाचित खटकणार नाही पण मुलगा? आपण पशू-पक्षी नाही माणसे आहोत. पशू-पक्ष्यांना हा प्रॉब्लेम येत नाही. कारण त्यांच्यातला फरक लक्षात येतोच असे नाही. पण माणसात असे घडत नाही. घडू शकत नाही. कावळा आहे की कावळी आहे, चिमणा आहे की चिमणी आहे हे कळत नाही. (निदान मला तरी) पण मुलगा आहे की मुलगी हे एका ठराविक वयानंतर लक्षात येतेच.