सुरवातीला सर्वच मानवजात अंगावर कपडे न घालताच वावरत होती त्यावेळीच्या पुरुषांचे मन विचलित होत नसावे कपड्यांची उपलब्धता नसल्याने गरीब स्त्रीने एकाद्या पटकुरावर आपले शरीर झाकणे किंवा आदिवासी वगैरे स्त्रियांनी शरीराचा वरचा भाग उघडा ठेवणे या गोष्टीमुळेही त्यांच्याकडे पाहणार्‍या पुरुषाचे मन विचलित होणे शक्य आहेच. पण त्यात त्या दोघींचा - एकीचा दारिद्र्यामुळे व दुसरीचा प्रथा म्हणून - नाइलाज असतो त्यात त्याना व्यक्तिस्वातंत्र्याचा टेंभा मिरवायचा नसतो, पण  भरपूर व अघळपघळ कपडे घालण्याची ऐपत असून केवळ आम्हाला कोणत्याही प्रकारचे  कपडे घालायचे स्वातंत्र्य  आहे  अशा आविर्भावात आखूड कपडे घालण्याचे कारण नाही इतकेच.  >> तुमच्या या वाक्यांमध्ये प्रचंड विसंगती व विरोधाभास आहे असं तुम्हाला जाणवत नाही का?
उदाः
१.  सुरवातीला सर्वच मानवजात अंगावर कपडे न घालताच वावरत होती त्यावेळीच्या पुरुषांचे मन विचलित होत नसावे >> म्हणजे कपडे घालू लागल्यावर पुरुषांचे मन विचलित होऊ लागले का?
आता त्या पुढे तुम्ही लिहिता...
२. कपड्यांची उपलब्धता नसल्याने गरीब स्त्रीने एकाद्या पटकुरावर आपले शरीर झाकणे किंवा आदिवासी वगैरे स्त्रियांनी शरीराचा वरचा भाग उघडा ठेवणे या गोष्टीमुळेही त्यांच्याकडे पाहणार्‍या पुरुषाचे मन विचलित होणे शक्य आहेच... >> तुमच्या वरच्या वाक्यात आणि या वाक्यात किती प्रचंड विसंगती आहे हे तुम्हीच पहा. 

त्यापुढे तुम्ही म्हणताय....

३. एकीचा दारिद्र्यामुळे व दुसरीचा प्रथा म्हणून - नाइलाज असतो त्यात त्याना व्यक्तिस्वातंत्र्याचा टेंभा मिरवायचा नसतो, पण  भरपूर व अघळपघळ कपडे घालण्याची ऐपत असून केवळ आम्हाला कोणत्याही प्रकारचे  कपडे घालायचे स्वातंत्र्य  आहे  अशा आविर्भावात आखूड कपडे घालण्याचे कारण नाही इतकेच.  >> याचा (दारिद्र्य , प्रथा, व्यक्तिस्वातंत्र्य, टेंभा इ.) आखूड कपड्यांमुळे मन विचलित होण्याशी काय संबंध? कुठे आखूड कपडे दारिद्र्य म्हणून आहेत, कुठे प्रथा म्हणून आहेत, कुठे व्यक्तिस्वातंत्र्य म्हणून आहेत तर कुठे टेंभा म्हणून आहेत.... तुमच्या म्हणण्याप्रमाणे मन तर सर्वच ठिकाणी विचलित व्हायला हवे ना? कारण ते ''पुरुषा''चे मन आहे. बाईच्या अंगावर कमी कपडे दिसले की ते विचलित होते असे तुमचे म्हणणे. मग जेव्हा पूर्वी कपडेच अस्तित्वात नव्हते तेव्हा ते विचलित होत नसावे असे तुम्ही कोणत्या आधारावर म्हणताय?