सावरकरांचे साहित्य जालावर मिळाले, त्यात ह्या दोन कविताही मिळाल्या.
निव्वळ कवितेच्या चालीचे म्हणाल तर (प्रत्येक ओळ स्वतंत्र वाचणे) वाचन सोप्पे आहे.
मात्रावृत्त असले तरी अक्षरगणाच्या परिभाषेत सांगायचे झाले तर वाचतानाचे वजन काहीसे असे होते आहे.
उदा. ये मृत्यो ! ये तू ये, यावयाप्रती
गागागा, गागागा, गालगालगा ।
हे वजन कायम ठेवून फक्त जिथे गा आहे तिथे दोन लघु अक्षरे वापरल्याचे जाणवत आहे.
उदा- निघालाचि असशिल जरि ये तरी सुखे । (लगागाल लललल लल गालगालगा)
पण पहिल्या ओळीतला शेवटचा शब्द हा पुढल्या ओळीतील पहिल्या शब्दाशी अन्वय साधतो आहे.
यावयाप्रती निघालाचि असशिल जरि, ये तरी सुखे ।
त्यामुळे दोन ओळी स्वतंत्र (किंबहुना, प्रत्येक ओळ स्वतंत्र) म्हणायची झाल्यास, चालीत म्हणणे सोपे आहे.
पण हे असे प्रत्येक ओळीशेवटचे आणि त्यापुढील ओळीच्या सुरुवातीच्या शब्दांचे अन्वय लक्षात घेऊन आणि ते निव्वळ वाचनातून
ऐकणाऱ्याला समजतील असे वाचणे अवघड आहे.
(असा अन्वय एक-दोन ठिकाणी असेल तर तितके कठीण नाही, पण जवळपास सर्वच ओळींमध्ये असा अन्वय दिसून येतो. )
सावरकरांच्या ह्या प्रतिभेला सलाम !!