सुरक्षा व्यवस्थेतील हे घोळ वृत्तपत्रांतून छापण्या इतके गंभीर दर्जाचे ठरू शकतात. आपण ज्या ठिकाणी राहतो, ज्या वास्तूच्या मेंटेनन्सचे पैसे भरतो, तिथे प्रत्यक्षात कितपत सुरक्षा पाळली जाते, अस्तित्वात असलेली सुरक्षा व्यवस्था व कर्मचारी यांची शहानिशा याविषयी व्यापक प्रमाणात जागृती होणे आवश्यक आहे. नवीन गृहप्रकल्पांमध्येही सदनिका खरेदी करताना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काय काय तपासणी करावी याचे एक ट्यूटोरियलच ग्राहकांसाठी आवश्यक आहे.