जी स्त्री उत्तेजक वेशभूशा करते तिच्यावरच बलात्कार होतो हे खरे नाहीच. पण ती दुसऱ्या स्त्रीवरील बलात्कारास कारण ठरू शकते. केवळ उत्तेजक कपडे हे बलात्कार होण्यास पुरेसे कारण नसते. तर मन विचलित झालेल्या पुरुषाच्या आजुबाजूची परिस्थितीचा त्यावर मोठा परिणाम होतो.
उदाहरणार्थ, समजा एखादा पुरुष अंगप्रदर्शन मोठ्या प्रमाणात असणारा एखादा चित्रपट पाहून आला आणि त्याने त्याचे चित्त विचलित झाले. वा तो एखाद्या पार्टीला जाऊन आला जिथे असे अंगप्रदर्शन करणाऱ्या स्त्रिया मिरवत होत्या. आता चित्रपटातल्या बाईवर त्याने बलात्कार करणे शक्य नाही. पार्टीमध्ये अनेक लोक असल्यानेही त्याला संधी मिळणार नाही. आता तो घरी येत असताना समजा त्याला रस्त्यावर झोपलेली बाई दिसली, समजा तो इस्पितळात काम करत असेल तिथे तो कामावर गेला आणि त्याला महिला रुग्ण दिसली वा अशी कोणीही दिसली जी एकटी आहे, त्यामुळे तिला वाचवायला येणारे कुणी नाही वा ती असहाय्य आहे त्यामुळे स्वतःचा बचाव करू शकत नाही. आता अशा स्त्रीवर अत्याचार करणे त्याला सहज शक्य आहे. मग ती स्त्री नखशिखान्त कपड्यात गुंडाळलेली का असेना. त्याचे मन त्या स्त्रीच्या नव्हे तर आधी पाहिलेल्या स्त्रीयांमुळे विचलित झाले आहे, पण त्याचा वाईट परिणाम मात्र इतर स्त्रियांवर झाला.
आता अशा उत्तेजक पेहेराव करणाऱ्या स्त्रिया सतत दिसत राहित्या तर हे पाहणाऱ्या पुरुषाचे चित्त विचलित झाले आणि असे अनेक वेळा झाल्यावर त्याचा त्यावरचा संयम सुटला, त्याला असहाय्य एकटी स्त्री सापडल्यावर तो तिच्यावर काढला असे होऊ शकते. त्यामुळे कारणानंतर परिणाम घडण्यामध्ये वेळ गेला तरी त्यांचा कार्यकारण संबंध असू शकतो.