हा कार्यकारण भाव मला थोटका वाटतो. नग्नता ही चित्रे, शिल्पे, चित्रपट, साहित्य यांतही ठासून भरलेली असतेच की! त्या त्या गोष्टी वाचल्या / पाहिल्या की देखील पुरुषांचे चित्त विचलित होत असेलच ना! भारतात काय किंवा अन्य देशांत, संस्कृतींत - स्त्रियांवर बलात्कार करणे ही काय स्त्रिया काळाच्या ओघात आखूड कपडे घालायला लागल्यावर त्यानंतर घडून येणारी घटना नाही हे सर्वज्ञात आहे. परकीय आक्रमणे, युद्धे, सक्तीचे विवाह, विधवांचे केशवपन करूनही व त्यांना लाल आलवणात रहायला लावूनही त्यांच्यावर होणारे बलात्कार.... आणखी काय लिहू? तिथेही आपली ''उत्तेजना'' अशा प्रकारे व्यक्त करण्यात एक कार्यकारणभाव असेलच ना?
बलात्कार हे तुमच्या लेखी फक्त एक ''कार्य'' असेल, दुसऱ्याच्या व्यक्तित्वाचा, त्याच्या सन्मानाचा, शरीराचा अवमान नसेल, तर ते फार दुर्दैवी आहे. पुरुषांवरही बलात्कार होतात. एरवी heterosexual असणारे पुरुष असा बलात्कार करतात. स्वतःची विकृती व्यक्त करतात. लहान मुले (पुरुष), लहान मुली यांतून सुटत नाहीत. त्यांचे उघडे अंग पाहून उद्दीपित होणाऱ्यांबद्दल तुम्हाला कोणता कार्यकारण भाव दिसतो?? बलात्कारात तुम्हाला कोठेही विकृती, मनाचा विकार - आजार दिसून येत नाही हे आश्चर्यच आहे!! ते काय मिठाईच्या दुकानात मिठाई दिसली - तोंडाला पाणी सुटले - खिशात पैसे नव्हते - म्हणून हात मारून झडप घालून मिठाई पळवली व खाल्ली इतके सोपे आहे का?