खरे तर "वरदा" व "संजय क्षीरसागर "यांनी अतिशय सुयोग्य शब्दात माझीच बाजू जणू मांडली आहे त्यामुळे मला लिहिण्याचे कारण नाही. पण माझ्यावर बोट रोखल्यामुळे मला प्रतिसाद देणे आवश्यक वाटते.
मी चर्चेस सुरवात करतानाच दोनच प्रश्न उपस्थित केले होते त्यात एक व्यक्तिस्वातंत्र्याचा व दुसरा स्त्रियांनाच आखुड कपडे घालणे आवश्यक का वाटते याचा. पुरुषाचे मन विचलित होण्याचा मुद्दा बातमीत होता.
सुरवातीला संपूर्ण मानवजातच नग्नावस्थेत राहत असताना पुरुषाचे मन विचलित होत नसावे असा तर्क मी मांडला कारण कपडे घालण्याच्या अवस्थेत स्त्रीच्या झाकलेल्या शरीराच्या भागाविषयी जे कुतूहल असते ते कोणीच कपडे घालत नसल्यामुळे राहत नाही. जसे हलवायाला मिठाईचे आकर्षण नसते किंवा घाणीत काम करणाऱ्यांना संवयीने किळस वाटेनाशी होते. आजही काही ठिकाणी नूडिस्ट समाज आहेत तेथे प्रवेश पाहिजे असेल तर आपल्या अंगावरचे सर्व कपडे उतरूनच जावे लागते.आणि शेवटी तो माझा तर्कच आहे असे मी म्हटले आहे.तसेच असेल असे म्हटले नाही. बाकी कोणत्याही अपुऱ्या वस्त्रांकित स्त्रीला पाहून पुरुषाचे मन विचलित होते हे मी मान्य केलेच आहे त्यामुळे यात काही विरोधाभास नाही.
अंगाव्रर भरपूर कपडे घालणाऱ्या बायकांवरही बलात्कार होतात किंवा लहान कोवळ्या मुलींवरही होतात हे खरेच आणि म्हणूनच कमी कपडे घातल्यामुळे बलात्कार होतात असे मत मी कोठेच व्यक्त केलेले नाही. मात्र घराचा पूर्ण बंदोबस्त करूनही दरोडे पडतात म्हणून घर कोणी उघडे ठेवीत नाही किंवा अमेरिकेसारख्या देशाची सुरक्षाव्यवस्था भक्कम असूनही ९/११ ची दुर्घटना घडली म्हणून देशाला संरक्षण व्यवस्थाच नको किंवा आहे त्या लष्करात कपात करा असा आग्रह कोणी धरत नाही.