अंगाव्रर भरपूर कपडे घालणार्‍या बायकांवरही बलात्कार होतात किंवा लहान कोवळ्या मुलींवरही होतात हे खरेच आणि म्हणूनच  कमी कपडे घातल्यामुळे बलात्कार होतात असे मत मी कोठेच व्यक्त केलेले नाही. मात्र घराचा पूर्ण बंदोबस्त करूनही दरोडे पडतात म्हणून घर कोणी उघडे ठेवीत नाही किंवा अमेरिकेसारख्या देशाची सुरक्षाव्यवस्था भक्कम असूनही ९/११ ची दुर्घटना  घडली म्हणून देशाला संरक्षण व्यवस्थाच नको किंवा आहे त्या लष्करात कपात करा असा आग्रह कोणी धरत नाही.  >> अगदी क्षणभर हा तर्क मान्य केला, तर इथे घर उघडे याचा अर्थ = नक्की काय? स्त्रीने नक्की कोणता बंदोबस्त करावा म्हणजे तिच्या शरीरावर व मनावर दरोडा पडणार नाही? तिने नक्की कोणत्या प्रकारे वेश केला म्हणजे १००% तिच्यावर बलात्कार होणार नाही? कोणत्या प्रकारे / कोठे वावरली म्हणजे तिच्यावर बलात्कार किंवा तत्सम प्रसंगांची शक्यताच ओढवणार नाही? तुमच्याकडे काय गॅरंटी आहे का, की ठीक आहे... जगातील सर्व बायकांनी आपली शरीरे पूर्णपणे झाकतील असे कपडे घातले की जगातील बलात्कार पूर्णपणे थांबतील? किंवा पुरुषांचे मन विचलित होणे थांबेल?