मग सनातनी / पातशाही पद्धतीनुसार स्त्रियांना संपूर्ण अंग झाकायलाच सांगावे काय? आणि तेही जगातील सर्व स्त्रियांना? कारण न जाणो, उद्या पाश्चात्य जगातील तथाकथित ''उत्तान'' कपडे घातलेल्या बाईला पाहून मन विचलित झालेला पुरुष पौर्वात्य संस्कृतीतील बुरखा/ घुंगट इत्यादीत आपादमस्तक झाकलेल्या स्त्रीवर अत्याचार करण्यास मागेपुढे बघणार नाही....
तसेच ''उत्तान''तेची, ''आखूड''पणाची, ''प्रक्षोभक'' वस्त्रे/ हावभाव/ देहबोली यांचीही सर्व देश, प्रांत, संस्कृती, धर्म, राष्ट्रीयत्व इत्यादींना समाविष्ट करणारी एक जगन्मान्य व्याख्याच करावी... आजकाल जग ग्लोबल झालंय ना... सकाळी सिंगापुरात असणारा माणूस सायंकाळी भारतात, आणि त्यानंतर २४ तासांत अमेरिकेत पोहोचू शकतो... त्यामुळे उगाच देश बदलला म्हणून घोळ नको... आणि त्या व त्याच व्याख्येनुसार ठरवावे कोणता वेश कोणासाठी प्रक्षोभक / आक्षेपार्ह/ उत्तान वगैरे वगैरे. नाहीतर वेगळी सांस्कृतिक / धार्मिक / प्रांतिक इ. इ. मूल्ये असणाऱ्या कोणाचा गैरसमज नको व्हायला. 
मी खात्रीपूर्वक सांगते की जरी बायकांनी पायघोळ स्कर्ट, संपूर्ण बाह्यांचे ब्लाऊझ, त्यावर कोट, डोक्याला स्कार्फ / ओढणी असा वेश केला तरी १% देखील बलात्कार कमी होणार नाहीत. मी याची गॅरंटी सांगते. तुम्ही त्याच गॅरंटीने सांगू शकता का, की ते तसे कमी होतील?