१) संदर्भ नीट पाहा : चर्चा पेहेरावा पुरती (आणि ती ही मुद्दाम केलेल्या उत्तेजक पेहेरावा पुरती) मर्यादित ठेवली तर विषय सोपा आहे
२) बलात्कार का होतो हा पूर्णपणे वेगळा विषय आहे
३) आणि माझं म्हणणंय की : ‘पेहेराव स्वतःचं व्यक्तीमत्वच दर्शवतो’. साधी गोष्ट आहे, वस्त्र कामुक नाहीत, निर्जीव आहेत, ती परिधान करणाऱ्याची मानसिकता ती (किंवा तो) काय परिधान करणार हे ठरवते.
याही पुढे जाऊन मी सांगीन की तीच वस्त्र वेगवेगळी मानसिकता असणाऱ्या व्यक्ती देह झाकण्यासाठी किंवा देह प्रदर्शनासाठी परिधान करू शकतात. साडी तीच आहे पण मल्लिका शेरावतची ती परिधान करण्याची पद्धत आकर्षणाची परिसीमा करेल. जीन्स आणि शर्ट तोच आहे पण झिया खान (नि:शब्दमधे) तोच पेहेराव वापरून इतक्या उत्तेजक पद्धतीनं बसेल की कुणाचंही लक्ष वेधलं जाईल.
४) > मग स्त्री ही आपल्या वेशाने बलात्कारासारख्या हीन गुन्ह्याला आमंत्रणच देत असते अशी पोकळ विधाने करा.
= इथे बलात्काराची कारण मिमांसा नाहीये, वस्त्राचा उपयोग देह झाकायला आहे का त्याचं प्रदर्शन करायला आहे हा मुद्दा आहे आणि म्हणून परिधान करणाऱ्याची मानसिकता निर्णायक आहे.
५) > मला वाटते की स्त्रीची ती एक ''स्त्री'' आहे हीच चूक आहे!!
= तुम्ही विषय भावनिक केलायं, प्रश्न साधा आहे आणि उत्तरही साधंय :
ऊत्तेजक वस्त्र परिधान करणारी स्त्री देहप्रदर्शन करून पुरूषांना आकर्षित करते की नाही? इतकाच विचार करा मग तुम्हाला कळेल की उत्तर उघड आहे आणि इतकी चर्चा उगीच चाललीये.
संजय