फार चांगला मुद्दा काढलात : तुमच्या म्हणण्यानुसार वस्त्रे कशी, किती लांबीची इत्यादी तपशीलांपेक्षा ती घालणारी व्यक्ती - तिची मानसिकता हे पुरुषाला वाटणाऱ्या त्या ''आकर्षणाची परिसीमा'' व्हायचे किंवा नाही हे ठरवतात, बरोबर ना?
मग व्यक्ती तितक्या प्रकृती हा न्याय इथे लागू व्हायला हवा ना? की सर्व स्त्रियांना त्यांच्या वेशावरून सरसकट एकाच तराजूत तोलायचे?
आखूड स्कर्ट घालणाऱ्या स्त्रीची मानसिकता तिच्या ड्रेसवरून ठरवायची का? मग साडी नेसणाऱ्या स्त्रीची मानसिकताही तिच्या ड्रेसवरून ठरवता येईल का? साडी नेसणारी कोणीही स्त्री इतरांना आकृष्ट करत नसेल असेच मग म्हणावे लागेल. पण वर तर तुम्ही म्हणता की मल्लिकाच्या बाबतीत ती आकर्षणाची परिसीमा असेल. म्हणजे वस्त्राची लांबी + रुंदी + नेसण्याची पद्धत + वस्त्र घालणारीची मानसिकता हे सर्व पाहणारा पुरुष आपल्या एका ''नजरे''त ठरविणार.... बरोबर ना? त्यातून तो कोण्या अन्य संस्कृतीतील / प्रांतातील असेल तर मग विचारायलाच नको! त्या स्त्रीला त्याच्या + स्वतःच्या प्रांतातील निकषांप्रमाणे वस्त्र + मानसिकता ''सभ्य'' ठेवावी लागणार!

स्त्रीने वस्त्रांचा उपयोग शरीर झाकणे की देहाचे प्रदर्शन करण्यासाठी करायचा हे कोण ठरविणार? कोणती शासकीय संस्था? व्यक्ती? स्त्री? पुरुष? समाज? प्रत्येक देशात 'डिसेन्सी' ची किंवा 'सभ्यते'ची व्याख्या बदलते. प्रत्येक धर्मात ती बदलते. प्रत्येक समाजात बदलते. मग सर्वसमावेशक व्याख्या तरी सांगा. कारण आजकाल ग्लोबल संस्कृती आहे.